राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी ढमाले यांना महापौरांच्या शुभेच्छा Print

प्रतिनिधी
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा २०१२ साठी निवड झाल्याबद्दल महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे कर्मचारी रामदास ढमाले यांचा महापौर शीला शिंदे यांनी सत्कार केले व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत ढमाले यांनी १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण व २०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यातून त्यांची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी यापूर्वी विविध राष्ट्रीय, तसेच राज्य अपंग क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. सन १९९४ मध्ये त्यांनी पुण्यात सलग ३८ तास पोहण्याचा विक्रम केला आहे.
नगर मनपाचे नाव तुम्ही उज्वल कराल याची खात्री आहे, अशा शब्दात महापौरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक दिलीप सातपुते, तसेच जनसंपर्क अधिकारी सुनीता पारगावकर, बाबू चोरडिया, राजेश लयचेटी, राहूल चव्हाण, अनिल आढाव, विजय धनेश्वर, सुभाष वाकळे आदी उपस्थित होते.