टिळकनगर इंडस्ट्रीजची ७ कोटींची फसवणूक Print

श्रीरामपूर/प्रतिनिधी
येथील टिळकनगर इंडस्ट्रीजची मद्यविक्री व्यवहारात ६ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी हैदराबाद येथील मनोज रुपाले व रमेश बुद्रपूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात टिळकनगर इंडस्ट्रीजचे अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील दोघांनी टिळकनगर इंडस्ट्रीजशी मद्यनिर्मितीचा करार केला. त्यानुसार इंडस्ट्रीमध्ये मद्यनिर्मिती करण्यात आली. या मद्याची आंध्र प्रदेशात विक्री केल्यावर ६ कोटी ८९ लाख ८८ हजार ९९२ रुपये भरणे आवश्यक असताना ती न देता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे करीत आहेत.