कर्जत तालुक्यात गारपीट, वादळी पाऊस Print

कर्जत/वार्ताहर
दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आज गारपीट व वादळी पावसाने आणखी एक संकट उभे केले. तालुक्यातील दगडी बारडगांव, तलवडी, धालवडी, कुळधरण व राशीनच्या काही परिसरात आज सायंकाळी वादळी पाऊस व गारपीट झाली.
सायंकाळी अचानक जोरदार वारे सुटले व कुळधरण परिसरातील तलवडी, धालवडी व राशीन परिसरातील बारडगांव दगडी व काही भागांत काही क्षणातच दाणादाण उडाली. या पावसाने बारडगांव दगडी येथील भुजंग लालचंद कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. शेतातील अन्य उभ्या पिकांचेही या पावसाने नुकसान केले आहे. ज्वारी, ऊस, मका यासह फळबागा त्यात कोलमडल्या आहेत. विविध ठिकाणच्या जनावरांच्या छावण्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आज जामखेड शहरातही चांगला पाऊस झाला.