भास्करगुरू धर्माधिकारी यांचे निधन Print

अकोले/वार्ताहर
जुन्या पिढीतील वेदशास्त्र संपन्न भास्करराव नरहर तथा भास्करगुरू धर्माधिकारी यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. धनेश्वर धर्माधिकारी गुरूजी यांचे ते वडिल होत. भास्करगुरूंनी नगर शहरात प्रदीर्घ काळ पौरोहित्य केले. अलीकडच्या काही वर्षांतच त्यांनी वयोमानानुसार पौरोहित्य थांबवले होत.