नाटकाच्या तालमींचा शुभारंभ Print

प्रतिनिधी
राज्य नाटय़ स्पर्धेत जय बजरंग कला मंडळाच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या ‘निशब्द: वृक्षावर कातरवेळी’ या दोन अंकी नाटकाच्या तालमीचा शुभारंभ ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद खेर यांच्या हस्ते व ‘लोकसत्ता’चे ब्युरो चिफ महेंद्र कुलकर्णी, डॉ. सुचित तांबोळी, प्रा. चं. वि. जोशी, कथाकार संजय कळमकर, पत्रकार श्रीराम जोशी, दशमीगव्हाणचे सरपंच बाळासाहेब काळे, प्रा. सुभाष काळे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करुन करण्यात आला.
 नाटक स्पर्धेत नाव मिळवेल, तसेच ग्रामीण व शहरी कलावंत, तंत्रज्ञ यांच्यातील दरी भरुन काढेल, अशी अपेक्षा खेर यांनी व्यक्त केली. नाटकातील कलावंत राजेंद्र जोगे, चैतन्य खानविलकर, प्रा. रविंद्र काळे, मधुरा देशपांडे उपस्थित होते. लेखन रविंद्र काळे यांचे व दिग्दर्शन अनंत जोशी यांचे आहे. नाटकाचे प्रयोग पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आदी ठिकाणी होणार आहेत.