१४ वर्षांखालील क्रिकेट संघ जाहीर Print

प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्य़ाचा १४ वर्षांखालील संघ निवडण्यात आला. निवड चाचणीसाठी २०० खेळाडू आले होते, त्यातील २१ जणांची निवड करण्यात आल्याची मााहिती जिल्हा संघटनेचे सचिव संजय बोरा यांनी दिली.
निवड झालेले खेळाडू-यश भंडारी, जतिन पहुजा, निलय घोरपडे, यश जग्गी, यश जाधव, शुभम शहाणे, जतिन लालबेगी, अभिजित बोरुडे, शेख मुजाहुद्दिन, शौनक कुलकर्णी, फरदिन शेख, संकेत लोंढे, सौरव मोरे, ओम औटी, आदित्य काळे, किरण मखरे, कपिलेश पेवाल, चिराग शर्मा, अवधुत गुंफेकर, अभिषेक वाणी व देवेंद्र गोळे.
निवडीसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ. अरुण जगताप यांच्यासह सात जणांची समिती नेमण्यात आली होती. राज्य स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहेत.