कथा व कविता स्पर्धेत कुलकर्णी, जरांगे प्रथम Print

शब्दगंधची दशकपुर्ती
 प्रतिनिधी
शब्दगंध साहित्य परिषदेच्या दशकपुर्ती वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या स्त्री-भ्रुण हत्या विषयावरील कथा व कविता लेखन स्पर्धेत तुकाराम मोहन जरांगे (कविता लेखन, रु. १ हजार १, जाफराबाद) व रघुनाथ शरद कुलकर्णी (कथा लेखन, रु. १ हजार १, लातुर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
परिषदेचे सचिव सुनिल गोसावी यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. तो असा- कविता लेखन- विजय शिनगारे (द्वितीय, रु. ७०१, बीड), स्वाती पाटील (तृतीय, रु. ५०१, कर्जत) व वैशाली शिंपी (उत्तेजनार्थ, कोपरगाव). कथा लेखन- ल. कि. दिवटे (द्वितीय, रु. ७०१, आष्टी), सुषमा पाखरे (तृतीय, रु. ५०१, वर्धा), तेरेजा संसारे (उत्तेजनार्थ, राहुरी). कथालेखनाचे परिक्षण प्रा. बापु चंदनशिवे, प्रा. राधाकृष्ण जोशी व अजयकुमार पवार तर कविता लेखनाचे परिक्षण प्रा. शर्मिला गोसावी, प्रा. डॉ. अनिल गर्जे, राजेंद्र फंड यांनी केले. पारितोषिक वितरण परिषदेच्या संमेलनात ९ डिसेंबरला होईल.