धनगर समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करू Print

शिर्डीत खडसे यांचा इशारा
 राहाता/ वार्ताहर
धनगर समाज्याच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकारशी संघर्ष सुरुच ठेवणार असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिला.
शिर्डी येथे आज झालेल्या धनगर समाज आरक्षण हक्क परिषदेत खडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी भजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राम िशदे होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आ. हरिदास भदे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, समितीचे स्वागताध्यक्ष लहुजी शेवाळे, विठ्ठल रबदडे, दादाभाऊ चितळकर, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, उपनगराध्यक्ष  मारुती गिधाड आदी यावेळी उपस्थित होते.
खडसे म्हणाले, धनगर समजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु राज्य व केंद्र सरकार याकडे डोळझाक करीत आहे. युती सरकारच्या काळात धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. युती सरकाने श्रीक्षेत्र चौंडी येथे विकास योजना सुरु केल्या. मात्र राज्यातील आघाडी सरकराने या योजनांसाठी निधी देण्याचे बंद केल्याने येथील विकास कामे ठप्प झाली आहेत.
राज्यातील आघाडी सरकारने या समाज्याच्या अनेक योजना बंद केल्या. धनगर समाज्याच्या मागण्या आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मांडणार आहोत. सरकारने यावर सकारात्मक भुमिका न घेतल्या दिवसभरासाठी अधिवेशनाचे काम बंद पाडू असा इशारा खडसे यांनी दिला. शिर्डी लोकसभचे खा.भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, धनगर समाज्याला आरक्षण दिले तर आपली सत्ता जाईल याभिती पोटी राज्यकर्ते धनगर समाज्याला आरक्षणापसून जाणीव पूर्वक वंचित ठेवण्याचा डाव खेळत आहे. आ. राम िशदे म्हणाले, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी धगनगर समाज्याची नेहमीच अवहेलना केलेली आहे. यापुढे समाज्याचे ध्येय गाठण्यासाठी आरक्षण हक्क समितीच्या माध्यमातून संघर्ष उभा करुन सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा राज्यातील सव्वा कोटी धनगर समाजाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय राहाणार नाही अशा इशारा त्यांनी दिला.
धनगर समाज हक्क परिषदेचे स्वागताध्यक्ष लहुजी शेवाळे, अण्णासाहेब म्हस्के, गणेश हाके, आ. हरिभाऊ भदे, जोती भोकरे यांची भाषणे झाली. विठ्ठलराव रबदडे यांनी प्रास्तविक केले. परिषदेत पाच ठराव मंजुर करण्यात आले.