सिटी टाईम्सच्या पर्यटन विशेषांकाचे हजारे यांच्या हस्ते प्रकाशन Print

प्रतिनिधी
पर्यावरण व पर्यटनाचे महत्व सगळ्या जगाला कळले आहे, मात्र आपले सरकार जागे व्हायला तयार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. पत्रकार राजेश सटाणकर यांच्या सिटी टाईम्स या साप्ताहिकाच्या रौप्यमहोत्सवी पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे झाले. अंक चाळून हजारे यांनी त्याच्या मांडणीबद्धल व विषयांच्या निवडीबद्धल समाधान व्यक्त केले. पर्यावरण राहिलं तरच पर्यटनास वाव राहील असे ते म्हणाले. यावेळी स्वत: संपादक सटाणकर, राजेश बाठिया, रामा लोखंडे, भाऊ ठोंबरे, दिग्विजय सटाणकर आदी उपस्थित होते.