कोपरगाव तालुक्यात सात ग्रा. पं.ची निवडणूक Print

कोपरगाव/वार्ताहर
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये दि. २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोनेवाडी, बहादरपूर, करंजी चांदेकसारे, धारणगाव, खोपडी, तळेगाव मळे या गावांचा यात समावेश आहे. एकूण ६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पोहेगाव गटातील चांदेकसारे व सोनेवाडी या ग्रामपंचायतीत सर्वाधिक १३ सदस्य आहेत. त्या खालोखाल करंजी ११, बहादरपूरच धारणगाव प्रत्येकी ९ व खोपडी-तळेगाव मळे येथे प्रत्येकी सात जागा आहेत. निवडणुकीत एकूण १३,८८५ मतदार आहेत. पहिल्या टप्प्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा संपतो न संपतो तोच पुन्हा ७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली असून गावच्या पारापारावर या वर्षी कोणाची जिरवायची याच्याच चर्चा सुरू आहेत. यापैकी किती ग्रामपंचायत बिनविरोध होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.