निळवंडेतून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू Print

अकोले/वार्ताहर
निळवंडे धरणातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन चार दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे.  निळवंडे धरणातून मध्यंतरी जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले, मात्र हे पाणी मुख्यता भंडारदरा धरणातून सोडण्यात आले हाते. त्यामुळे निळवंडे धरण सध्या काठोकाठ भरलेले असून त्यात ४ हजार ७३२ द. ल. घ. फू. पाणीसाठा आहे. आज दुपारी दीड वाजता निळवंडे धरणातून १ हजार ४०० क्यसुेक्सप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. पाणी ओझरला पोहचल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण १ हजार क्युसेक्स केले जाईल. हे आवर्तन सुमारे चार ते पाच दिवस सुरू राहण्याची शक्यता असून चारशे ते पाचशे द. ल. घ. फू. पाण्याचा वापर यासाठी होण्याची शक्यता आहे.