ऐन पावसाळय़ातही साताऱ्यात २४१ टँक रद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा Print

वाई/वार्ताहर
सातारा जिल्हयात २४१ टँक रद्वारे २११ गावे व ८७५ वाडय़ा-वस्त्यांतील एकूण ३ लाख ९१ हजार ४६१ लोकसंख्येला पिण्याचा पाणीपुरवठा क रण्यात येत असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कोर्यकोरी अधिकोरी अभिजित बांगर यांनी आज येथे दिली.
जिल्हय़ात सध्या २४१ टँक रद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा क रण्यात येत असून १८९ विहिरी अधिग्रहीत क रण्यात आल्या आहेत.
 २४१ टँक रमध्ये माण तालुक्यात ८८ टँक रने ८६ गावे ४५० वाडय़ांतील १ लाख ३९ हजार ६२६ लोक संख्येला, खटाव तालुक्यात ९८ टँक रने ६५ गावे व १९९ वाडय़ांतील १ लाख ४५ हजार १६८ लोक संख्येला, क ोरेगाव तालुक्यात २० टँक रने ३२ गावे १५ वाडय़ांतील ४८ हजार ११९ लोक संख्येला, खंडाळा तालुक्यात ३ टँकरने १ गाव व ६ वाडय़ातील ६ हजार ६३९ लोक संख्येला, फ लटण तालुक्यात ३१ टँकरने २६ गावे व २०५ वाडय़ातील ४८ हजार ८४० लोक संख्येला आणि क राड तालुक्यातील एका गावांतील ३ हजार ६९ लोक संख्येला एका टँक रने पाणी पुरवठा सुरु आहे.  
जिल्हय़ात १८९ विहिरी अधिग्रहीत क रण्यात आल्या असून यामध्ये माण तालुक्यात ४७, खटाव तालुक्यात ८९, क ोरेगाव तालुक्यात ३५, खंडाळा तालुक्यात ७, फ लटण तालुक्यात १० आणि वाई तालुक्यात १ विहिरींचा समावेश असल्याचेही जिल्ह्य़ाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.