संख्याशास्त्र विषयावर कोल्हापुरात परिसंवाद Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त १२ व १३ रोजी संख्याशास्त्र विभागामार्फत रिसेंट डेव्हलपमेंट्स इन स्टॅटिस्टिकल मॉडेिलग विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादासाठी देशातील विविध विद्यापीठातील नामवंत १५ प्राध्यापकांना निमंत्रित करण्यात आले आहे. य देशभरातील २२४ हून जास्त संशोधक त्यांचे शोधनिबंध सादर करणार आहेत. ही माहिती विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व समन्वयक डॉ. डी. एन. काशिद यांनी दिली.
केंद्र शासनाचे डॉ. पी. व्ही. सुखात्मे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते संख्याशास्त्रज्ञ डॉ. जयंत देशपांडे, माजी अधिविभागप्रमुख डॉ. एम. एस. प्रसाद, डॉ. आर. एन. रट्टीहळ्ळी, डॉ. एस. आर. कुलकणी, डॉ. बी. व्ही. ढांड्रा, यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या परिसंवादामध्ये डॉ. सुब्रम्हण्यम, डॉ. यू. व्ही. नाईक-िनबाळकर, डॉ. डी. डी. हनगल, डॉ. एस. रवी, डॉ. टी. व्ही. रामनाथन, डॉ. ए. एस. कडी, डॉ. यू. जे. दीक्षित, डॉ. एस. व्ही. भट, डॉ. एस. बी. मुनोळी, डॉ. पी. व्ही. पंडित, डॉ. व्ही. बी. घुटे, डॉ. एस. बी. महाडिक, डॉ. एस. एल. सनासे हे निमंत्रित प्राध्यापक व्याख्याने देणार आहेत. याशिवाय १२ रोजी डॉ. जयंत देशपांडे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाची सुरुवात होईल. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमधील सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.