कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतीपकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार असून, १५ हजार ४२१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील २१९ अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, माघार घेण्यात आलेल्या उमेदवारांचा नेमका आकडा समजू शकला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्या. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायती आणि कंसातील बिनविरोध ग्रामपंचायतींची आकडेवारी पुढीलप्रमाणे - करवीरमधील ४९ (४)आजरा ३७ (६), चंदगड २६ (५), भुदरगड ४२ (१०), राधानगरी ४३ (१७), पन्हाळा ४५ (९), शाहूवाडी ४९ (१२), गगनबावडा २० (९), शिरोळ १६ (१), हातकणंगले ३९ (४), कागल २४ (१) अशाप्रकारे आहेत.
अंतर्गत संघर्षांतून मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले असल्याने काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात एकाच गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने त्यांना माघार घेण्यासाठी नेत्यांना मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत होते. ‘यावेळी नाही तर कधीच नाही’ असा ठाम निर्णय घेतलेले उमेदवार आता एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. करवीरमध्ये ग्रामपंचयतींसाठी दुरंगी, तिरंगी लढती होणार असून कणेरीवाडी, हणबरवाडी, नंदवाळ, पासार्डे आदी ठिकाणी बिनविरोध लढती झाल्या.
उर्वरित ४५ गावातील एकूण जागा कंसात, गावनिहाय उमेदवार - दोनवडे ९, म्हाळुंगे ११ (२२), सावर्डे दुमाला ९ (१९), सांगरूळ १७, पाडळी बा ९, सावरवाडी ९ (२३), िशगणापूर १३, वडणगे १७, आंबेवाडी ९ (१८), मांडरे ७, सादळे-मादळे ७, वाकरे १३, आरळे ९, कसबा बीड ११, हसूर दुमाला ११, चिंचवड तर्फे कळे ९, वरणगे ११, हिरवडे दुमाला ७, भुये ९, कांडगाव ११, िदडनेली ११, चुये ९,
कळंबे तर्फ ठाणे १३ (६३), वसगडे १६ (१२), कावणे ९ (१८) अशी आहेत.