गरजू अपंगांना यंत्र-साहित्याचे वाटप Print

सोलापूर /प्रतिनिधी
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व आर्टिफिशियल लिब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जाई-जुई विचारमंचच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना  यंत्र-साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे  पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात महापौर अलका राठोड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे विभागीय व्यवस्थापक आर.के. चतुर्वेदी, आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनचे कनिष्ठ व्यवस्थापक के. राजकुमार, सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज यलगुलवार, अमोल शिंदे सहभागी झाले होते. ९९ तीन चाकी सायकल, ५० कर्णयंत्र, १९ व्हिलचेअर, ४० कुबडय़ा, १० अंधकाठय़ांचे अपंगांना वाटप केले. महापौर अलका राठोड यांनी  या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.