आमदार जयंत पाटील यांचा उद्या सत्कार, Print

शेकापची सभा
कोल्हापूर / प्रतिनिधी
गेली १२ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची  सभागृहात पुन्हा बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवारी दुपारी १ वाजता सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती पक्षाचे राज्य सहचिटणीस व जिल्हा चिटणीस भाई संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्य़ात शे. का. पक्षाची कायम सत्ता आहे. महाराष्ट्र विधिमंडळात तेथून ४ आमदार प्रतिनिधित्व करतात. तसेच जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मार्केट कमिटय़ा व पंचायत समित्यांवरही शे.का. पक्षाचेच प्राबल्य आहे. आमदार पाटील या जिल्ह्य़ाचे समर्थपणे नेतृत्व करीत असून गेल्या तीन वर्षांपासून ते शे. का. पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची कोल्हापूर जिल्ह्य़ाला नव्याने ओळख व्हावी आणि बहुजन समाजातील कष्टकरी-शेतकरी वर्गाच्या प्रश्न, समस्यांचा ऊहापोह व्हावा, या उद्देशाने हा सत्कार समारंभ आयोजितकेला आहे. त्या निमित्त शे.का.पक्ष कार्यकर्त्यांची १४ ऑक्टोबर रोजी ताराराणी चौक-कावळा नाका येथून सकाळी ११ वाजता मोटारसायकल रॅली काढणार आहे. स्टेशन रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, महापालिका, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे निवृत्तीचौक उभा मारूती चौक, जुना वाशी नाका, संभाजीनगर, रेसकोर्स एस.टी.स्टँडवरून क्रशर चौक, सानेगुरूजी वसाहत राधानगरी रोडमार्गे पुईखडी येथे संकल्पसिध्दी हॉलमध्ये ही रॅली येईल. त्यामध्ये आमदारभाई जयंत पाटील यांच्या शेकापचे नेते सहभागी होणार आहे. त्यानंतर आमदार भाई जयंत पाटील यांचा माजी आमदार भाई संपतराव पाटील यांच्या हस्ते भव्य समारंभात सत्कार करण्यात येणार आहे. तरी या सत्कार समारंभास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.