संक्षिप्त Print

‘स्मॅक’च्या अध्यक्षपदी धनंजय पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी- शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) अध्यक्षपदी अभिजित कास्टिंगचे मालक धनंजय ऊर्फ डी. डी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नीता इंडस्ट्रिजचे एम.एन. पिल्ले यांची निवड करण्यात आली. ’स्मॅक’च्या शिरगावकर सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दिलीप लडगे होते. या वेळी बापूसाहेब जाधव, दादासाहेब चौगुले, पद्माकर सप्रे, प्रसाद मंत्री, सुरेंद्र जैन, राजू पाटील,  दीपक पाटील, भरत सोमय्या उपस्थित होते. स्मॅकचे सचिव टी. एस. घाटगे यांनी आभार मानले.
‘गोकुळ’तर्फे महिलांसाठी सहल
कोल्हापूर/प्रतिनिधी- शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाची वाढ व्हावी आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारावी म्हणून गोकुळ दूध संघामार्फत विविध योजना राबविल्या जातात. संघामार्फत गावातील दूध डेअरीच्या माध्यमातून महिलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन सहल काढण्यात येते, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वास नारायण पाटील यांनी केले. हणमंतवाडी (ता. करवीर) येथील श्रीकृष्ण महिला सह. दूध संस्थेतर्फे महिला सभासदांच्या शैक्षणिक सहलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शैक्षणिक सहल अंतर्गत महिला सभासदांना गोकुळ दूध संघ, संघ पशुखाद्य कारखाना भेट घडवून गावातून संकलित झालेल्या दुधावर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात व इतर दुग्धजन्य पदार्थ कसे तयार होतात हे सांगण्यात आले, तर पशुखाद्यनिर्मिती दाखवण्यात आली तसेच यावेळी प्रकाश महाडिक, सेक्रेटरी एस. एम. पाटील, दळवी, संस्था सेक्रेटरी नारायण िशदे, संगीता िपजरे, तानाजी नरके, सर्व संचालक, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.