अक्कलकोटजवळ अपघातात बाप-लेकाचा मृत्यू Print

सोलापूर /प्रतिनिधी
एका जड वाहनाने ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावच्या शिवारात सायंकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर जड वाहन जागेवर न थांबता तसेच भरधाव वेगात निघून गेले.
उदय मुरलीधर माने (वय ३५) व त्यांचा मुलगा उत्कर्ष (वय ७, रा.नवीन राजवाडा चाळ, अक्कलकोट) अशी दुर्दैवी मृत बाप-लेकाची नावे आहेत. हे दोघे मोटारसायकलवरून दहिटणे येथे देवी दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना वाटेत एका दहा चाकी जड वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. यात या बाप-लेकाचा जागीच अंत झाला. अपघातानंतर वाहनचालकाने जागेवर न थांबता पलायन केले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.