भैरवनाथ कारखान्याचा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता Print

सोलापूर /प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ खासगी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊसपुरवठा केलेल्या सभासद शेतकऱ्यांना शंभर रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करून तो सभासदांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली. सभासदांना येत्या दिवाळीपूर्वी १२५ रुपयांचा हप्ता व प्रत्येकी २० रुपये दराने १० किलो साखर देणार असल्याचेही प्रा. सावंत यांनी जाहीर केले. कारखान्याने यंदाच्या वर्षी गळीत हंगामात चार लाख मे. टन ऊसगाळपाचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी भैरवनाथ साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊसपुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण सावंत, ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.