‘सेराटेक समूहा’ तर्फे कोल्हापूरमध्ये सॅनिटरी वेअरचे दालन Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
‘सेराटेक समूहा’ तर्फे कोल्हापूरमध्ये सर्व विख्यात ब्रँन्डस्च्या सिरॅमिक्स आणि सॅनिटरी वेअरचे अद्ययावत दालन सुरू करण्यात आले आहे. हे दालन कोल्हापुरात ताराबाई पार्क येथील ज्युपिटर बिल्डींग, रिलायन्स फूट प्रिंट्सजवळ, सावंत बंगल्यासमोर सुरू करण्यात आले असून ४ हजार ५०० स्क्वे.फूट जागेवर विस्तारले आहे. सेराटेक समूहाचे हे महाराष्ट्रातील चौथे दालन आहे. याआधी पुणे, चिंचवड व औरंगाबाद येथे दालने सुरू करण्यात आली आहेत.
 सेराटेकच्या या शोरूममध्ये टाईल्स, सॅनिटरी वेअर व बाथ फिटिंग्ज् मधील जागतिक दर्जाचे सर्व ब्रँडस् उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये एशियन टाईल्स तसेच जर्मन कंपनी डय़ुराविट व ग्रोहे यांची टॉयलेटस्, लॅविट्रीज्, बाथस्, फॉसेटस् इत्यादी दर्जेदार उत्पादने उपलब्ध असणार आहेत. त्याशिवाय विविध जगविख्यात कंपन्यांची सॅनिटरी वेअर, फॉसेट व सीपी (क्रोमप्लेटेड) फिटींग्ज देखील उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे एशियनसह पीसीआयपीएलतर्फे टर्की, चायना, स्पेन व इटली येथून आयात केलेल्या टाईल्स तसेच अनेक नामवंत कंपन्यांच्या सिरॅमिक वॉल व फ्लोअर टाईल्स्, विट्रीफाईड टाईल्स इत्यादी उत्पादनांचा आकर्षकरित्या डिस्प्ले करण्यात आला आहे. पुण्यातील आंबेगाव येथील ३० हजार चौरसफुटाच्या दालनाच्या माध्यमातून एक लाख चौ.फुटाचा मार्बल व ग्रेनाईटचा साठाही उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलतांना सेराटेकचे संचालक मुकेश आगरवाल म्हणाले की, कोल्हापूरकरांसाठी सेराटेकची शोरूम सुरू करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या दालनामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, उत्पादनांचा मोठा साठा, आकर्षक व्हरायटी, तत्पर सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्किटेक्टस्, इंटिरियर डिझायनर,बिल्डर्स व सामान्य लोकांना हे दालन नक्कीच आवडेल असे ते म्हणाले.
सेराटेक समूहाचे विपणन संचालक श्रीपाद बिडकर म्हणाले की, कंपनीने महाराष्ट्रात महत्त्वाकांक्षी विस्ताराची योजना आखली आहे. सध्या सेराटेकची पुणे, चिंचवड, औरंगाबाद अशी तीन दालने आहेत. आज कोल्हापूर येथे सेराटेकचे दालन सुरू करण्यात आले असून पुढील ३ वर्षांत महाराष्ट्र व गोवा येथे एकूण १२ नवीन दालने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी २ वर्षांत सेराटेक समूहाची उलाढाल ३०० कोटी रूपयांवर नेण्याचे उद्दिष्ट असून भक्कम विक्री व व्यवस्थापन विभागाच्या साथीने हा टप्पा निश्चितपणे गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.