चाळीस टक्के बोनस देण्याची यंत्रमाग कामागारांची मागणी
|
|
कोल्हापूर/प्रतिनिधी यंत्रमाग धंद्यातील मागवाला, जॉबर, कांडीवाली, ऑटो कामगार, दिवाणजी, चेकर, मेंडर यांना त्यांच्या वार्षिक पगाराच्या दीडपट पगारावर ४० टक्के बोनस मिळावा अशी मागणी इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनी येथे दसऱ्याला झालेल्या मेळाव्यात करण्यात आली.
अध्यक्षस्थानी लाल बावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष दत्ता माने होते. कांबळे म्हणाले की, यंत्रमाग कामगार रोज १२ तास काम करुनही त्याला किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळतो. प्रत्येक कामगाराची ४ तास कामाच्या दुप्पट पगाराची रक्कम ५० हजार रुपये होते. किमान वेतनाचा वार्षिक फरक २० हजार रु पये होतो. या रकमांचा विचार केल्यास ४० टक्के बोनस कमीच होतो. शिवगोंडा खोत यांनी केंद्र सरकारची यंत्रमाग कामगारांसाठी असलेली पेन्शन योजनेची माहिती सांगितली आणि त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अॅड.जयंत बलुगडे म्हणाले, कामगारांच्या अंगावरील बाकीमुळे कामगार मालकांच्या दहशतीखाली वावरत आहे; मात्र कामगारांनी बाकीचे दडपण झुगारून देऊन बोनस व पगारवाढीच्या लढयात उतरण्याचे आवाहन केले. |