सोलापुरातही मेघगर्जनेसह पाऊस |
![]() |
सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. नवरात्रौत्सवात अष्टमीच्या दिवशी पावसाने चांगलीच हजेरी लावून सर्वाना आनंद दिला होता. त्यानंतर आज शुक्रवारी कोजागरी पौर्णिमेच्या तोंडावर पुन्हा वरूणराजाने कृपा केली. आकाशात ढगांचा गडगटाट होऊन विजांचा कडकडाट होऊ लागला आणि त्यापाठोपाठ पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. काही भागात रस्ते अक्षरश: जलमय झाल्याने तेथील वाहने चालविताना वाहनधारकांची त्रेधातिरपीट झाली. मात्र हा पाऊस सर्वदूर नसल्याचे सांगण्यात आले. |