कोल्हापुरात पावसाची हजेरी Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
शुक्रवारी दिवस मावळल्यानंतर कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाडा असताना सायंकाळी अचानक पाऊस झाल्याने कोल्हापूरकरांची तारांबळ उडाली. अशातच ग्रामीण भागातील वीजगायब झाल्याने नागरिक त्रस्त होते.
गेल्या पंधरवडय़ात पावसाने दडी मारली आहे. नवरात्रीत पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या. या आठवडय़ात दिवसा कडक उन्ह असले तरी मध्यरात्रीनंतर थंडी पडण्यास सुरुवात होते. उन्हाळा-हिवाळा हे ऋतू एकाच वेळी जाणवत असताना आज पावसानेही हजेरी लावली. सुमारे अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अवघे कोल्हापूर जलमय झाले. प्रवासी, फिरते विक्रेते, पादचारी यांची धावपळ उडाली. तर अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने तेथील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.