शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण - संभाजीराजे Print

पंढरपूर -
शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांच्या नावावर राजकारण करणारे राज्यकर्ते त्यांच्या विचारांना मात्र तिलांजली देत असल्याची टीका युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी येथे केली. पंढरपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गड-किल्ल्याची जपणूक करणे हे अत्यंत गरजेचे आहे. या ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष केले तर येत्या १५ ते २० वर्षांत हा ऐतिहासिक ठेवाच संपुष्टात येईल. ते जतन करणे गरजेचे आहे. नेहमीच विदेशी सहलीवर जाणाऱ्या राज्यकर्त्यांनी  वेळ काढून रायगडावर सहल काढून इतिहास जाणून घ्यावा व त्याची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समुद्रात उभारण्यात येणारा पुतळा, पर्यावरण इतर परवानग्या यात अडकला आहे. अडथळे बरेच आहेत. ते अडथळे पूर्ण होई तोपर्यंत किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता शासनाने लक्ष द्यावे असे म्हणाले.