किरण गुरव यांच्या कथासंग्रहास पुरस्कार Print

कोल्हापूर -
मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठीतील विविध वाङ्मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतात. किरण गुरव यांचा ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा कथासंग्रह मुंबईच्या शब्द प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. समकालीन महत्त्वाच्या कथाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या ७७व्या वर्धापनदिनी दि. २८ ऑक्टोबर २०१२ रोजी सायंकाळी ५ वाजता साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृहात एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.