‘वारणा गोल्ड सर्टिफिकेट’ योजनेचा प्रारंभ Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
वारणा बँकेच्या बहुचर्चित ‘वारणा गोल्ड सर्टिफिकेट’ योजनेचा प्रारंभ बँकेच्या सर्व शाखांमधून दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. याचे औचित्य साधून एकूण रु. ५ कोटी सर्टिफ़िकेट्सची विक्री झाली. पहिल्याच दिवशी सर्व शाखांमधून उत्तम प्रतिसाद लाभल्याने सर्व शाखांचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू ठेवावे लागले, असे बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी सांगितले. ठेवीदारांनी खरेदी केलेल्या सर्टिफ़िकेटचे वितरण शाखांमधून बँकेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आले.
या ठेव योजनेंतर्गत ग्राहकांना रु. ५ हजार, रु. १० हजार, रु. ५० हजार, रु. १ लक्ष व रु. ५ लक्ष अशी पाच वेगवेगळ्या आकर्षक रंगातील ३९ महिने मुदतीची व १०.५० व्याजदराची सर्टिफिकेट्स खरेदी करता येतील. योजना सर्वासाठी खुली असल्याने ही सर्टिफिकेट वैयक्तिक, संयुक्त, अज्ञान पालनकर्ता, फ़र्म व संस्था यांच्या नावे खरेदी करता येतील. संबंधित ठेवीदारास त्याने खरेदी केलेल्या कॅश सर्टिफ़िकेटच्या तारणावर गरज भासेल तेव्हा ९० टे इतकी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. बँकेच्या या योजनेला उदंड प्रतिसाद दिलेल्या ठेवीदारांचे आभार प्रदर्शित करून ही ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय चांगली असून, अल्प कालावधीसाठीच असल्याने सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांनी या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निपुण कोरे यांनी केले.