संक्षिप्त Print

सोलापूर विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा
सोलापूर/प्रतिनिधी-सोलापूर विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त सोहळा येत्या गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ‘नॅक’चे संस्थापक संचालक डॉ. अरुण निगवेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या निवृत्तीला काही दिवस उरले असताना हा दीक्षान्त समारंभ घाईगडबडीने आयोजित करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या वर्तुळात बोलले जात आहे.
अंबाबाई मंडळातर्फे रक्तदान
कोल्हापूर/ प्रतिनिधी- श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या नवरात्रोत्सवातील उपक्रमांची सांगता रक्तदान शिबिराने झाली. यामध्ये शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. वैभवलक्ष्मी रक्तपेढी व छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागीय रक्तपेढीच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. श्रीपूजक मंडळाने नवरात्रोत्सवात आपत्कालीन मदत केंद्राबरोबरच काही नवे उपक्रम हाती घेतले. याची सांगता रक्तदान शिबिराने झाली. याचे उद्घाटन प्रादेशिक सेनेचे कर्नल विजय मनराल, प्रांताधिकारी गलांडे यांच्या हस्ते झाले. स्वागत माधव मुनिश्वर यांनी केले. यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, उज्ज्वल नागेशकर, मनोज मुनिश्वर, अरिवद चौधरी, दत्तात्रय मुनिश्वर, उदय गोटिखडीकर, किशोर मुनिश्वर, चेतन चौधरी, अजित ठाणेकर, सारंग व सायली मुनिश्वर आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी- कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या करिता २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यातून निवडणूक यंत्रणा नि:श्वास घेण्यापूर्वीच दुसरा टप्पा जाहीर झाला आहे. ४४ ग्रामपंचायतींकरिता ७ नोव्हेंबरपासून उमेदवारीअर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ७ ते १० या कालावधीत उमेदवार अर्ज भरले जाणार आहेत. १२ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारीची मुदत १६ नोव्हेंबर आहे. २६ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते पाच या कालावधीत मतदान होऊन दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
शाहू कलादालनामध्ये प्रदर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी-शाहू स्मारक भवनच्या कलादालनामध्ये दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थिनींच्या ‘क्रिएशन विथ इनोव्हेशन’ या चित्र, मुद्राचित्र प्रदर्शनास प्रारंभ झाला. उद्घाटन विजयमाला मेस्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य अजय दळवी, संजीव संकपाळ यांच्यासह चित्रकार, कला विद्यार्थी, रसिक उपस्थित होते.प्रदर्शनात श्रद्धा पोंबुर्लेकर, सविता पाटील, अमृता पाटील, श्रद्धा तावरे, तेजस्विनी जाधव, मानसी चौगुले यांच्या चित्राकृती, मुद्राचित्रांचा समावेश असून प्रदर्शन ३ नोव्हेंबपर्यंत खुले राहणार आहे.
अजित हेरलगे यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी- जवाहर साखर कारखान्याचे अकौंटंट अजित धनपाल हेरलगे यांचे श्री क्षेत्र सम्मेद शिखरजी येथे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे.
डॉ.व्यंकटेश नुले यांचे निधन
सोलापूर / प्रतिनिधी- सोलापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा मसापच्या सोलापूर शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. व्यंकटेश नुले (७०) यांचे नुकतेच  अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रोटरी क्लबच्या कार्यक्रमासाठी डॉ. नुले जालन्याला जात असताना बीडजवळ त्यांच्या मोटारीला अपघात झाला. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. डॉ. नुले यांनी मराठी व हिंदी साहित्यावर पीएच. डी. केली होती. कारवार जिल्ह्य़ातील एका महाविद्यालयात ते प्राचार्यपदावर काही वर्षे कार्यरत होते. नंतर ते सोलापुरात दूरसंचार विभागात काही काळ सेवेत होते. त्यांच्या पार्थिवावर रूपाभवानी मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  
दक्षता जनजागृती सप्ताह
वाई/वार्ताहर-जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या वतीने आजपासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त निवासी उपजिल्हाधिकोरी सोनाप्पा यमगर लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक  श्रीहरी पाटील, यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकोऱ्यांच्या उपस्थितीत येथे प्रतिज्ञा घेण्यात आली. येथील नियोजन भवनामध्ये दिनांक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त अधिकोरी, क र्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी प्रतिज्ञा दिली.
महर्षी वाल्मीकी यांना आदरांजली
वाई/वार्ताहर-महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकोरी सोनाप्पा यमगर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी रु खी समाजाचे अध्यक्ष अशोक राव मारु डा, वाल्मीकी समाजाचे अध्यक्ष बबलू सोळंखी तसेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, उपजिल्हाधिकोरी संजय देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकोरी भानुदास गायकवाड, वाईचे प्रांताधिकोरी सूरज वाघमारे, पोलीस निरीक्षक  वैशाली पाटील, तहसीलदार विकोस खरात, वैशाली राजमाने, सहायक  प्रादेशिक  परिवहन अधिकारी अशोक  पवार यांच्यासह अन्य महसूल, पोलीस व अन्य विभागातील अधिकोरी, क र्मचारी उपस्थित होते.
‘आप को ध्यावो’चा अनुवाद प्रकाशित
कोल्हापूर / प्रतिनिधी- येथील गीता मंदिरामध्ये ध्यानयोगी श्री साई काका यांच्या प्रवर्चनावर आधारित ‘आप को ध्यावो’ या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात आला. एकोहं-बहूश्याम या रूपामध्ये पुस्तकाचा अनुवाद शुभांगी पाटील यांनी केला आहे. पुस्तक अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ.सुभाष देसाई होते. प्रास्ताविकात शुभांगी पाटील यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास कथन केला. या वेळी दिगंबर जोशी, ए.के.कमते (बेळगाव), निवृत्त आयकर आयुक्त अच्चुत फडके यांनी विचार मांडले. पत्रकार डॉ.देसाई यांनी पुस्तकातील काही प्रकरणांवर भाष्य तर केलेच. शिवाय गौतम बुद्धांनी सांगितलेली पंच महाभुतांवर लक्ष केंद्रित करून करावयाची ध्यानपद्धती सांगितली. श्री साईकाका यांच्या उपस्थितीत ध्यान, श्रीयंत्र, कुंकुमार्चना, भजनाचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाला कोल्हापूर, सांगली, पाचगणी, पुणे, सातारा, इस्लामपूर येथील भाविक हजर होते.