‘कृष्णा’ चा शुक्रवारी गळीत हंगाम प्रारंभ Print

कराड/वार्ताहर
रेठरे बुद्रुकच्या माहेरवाशीण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २) सकाळी होणार आहे. गळीत हंगाम शुभारंभानिमित्त सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक वसंतराव साळुंखे व त्यांच्या पत्नी मंगलताई साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सभासद ऊस उत्पादक, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते व प्रभारी कार्यकारी संचालक सी. टी. साळवे यांनी केले आहे.