शेतकऱ्यांच्या हिताच्या शिफारशी मंजूर व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील- सतेज पाटील Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
गतवर्षी गाळपास आलेल्या उसास तिसरा हप्ता मे. टन १०० रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणेरी मठाचे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज होते.
रंगराजन समितीच्या सर्वच शिफारशी शेतकऱ्याच्या हिताच्या नाहीत, असे सागून मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्याच सर्व शिफारशी मंजूर व्हाव्यात यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जातील, असे सांगितले. कारखान्याचा सहवीज प्रकल्प येत्या जानेवारीपर्यंत सुरू होईल.
सहवीज प्रकल्पानंतर उसाला जादा १०० रुपये दर देणे शक्य होईल, असे पाटील यांनी सांगितले. कारखाना नवीन असूनही जिल्ह्यातील इतर प्रस्थापित कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे.
जिल्ह्यातील काही कारखाने कर्जात बुडत असताना डी. वाय. पाटील कारखाना मात्र कर्जफेड करीत आहे. अवघ्या दहाव्या गळीत हंगामातच सह-वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करणारा राज्यातील हा पहिला कारखाना असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते काटा पूजन व गव्हाणीत ऊसमोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमास  पी. एन. पाटील, कुलपती संजय डी. पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष कृष्णनाथ तांडेल, उपाध्यक्ष विद्याप्रसाद बांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संदीप नरके, बाळासाहेब खाडे, बाबासो चौगुल,
सुरेश पाटील, बी. के. डोंगळे, गगनबावडय़ाच्या सभापती सविता कोटकर, कार्यकारी संचालक
एस. बी. िनबाळकर यांनी स्वागत केले, तर संचालक टी. जी. पडवळ यांनी  कार्यक्रमाला उपस्थि राहिलेल्यांचे आभार मानले.