‘ऑथरेकेअर अँण्ड क्युअर’ ने विस्तार वाढवावा- पाटील Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
संशोधन वृत्ती आणि वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्याची गरजेचा नेमका मेळ घालत शून्यातून विश्व निर्माण केलेल्या संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑथरेकेअर अँण्ड क्युअर’ ने आता इम्लांटस्-इन्स्ट्रमेंटस क्षेत्रात विदेशातही  विस्तार करावा, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
मुडिशगी येथील  ऑथरेकेअर अँन्ड क्युअर इंडिया प्रा.लि.च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक जाधव यांनी वैद्यकीय विश्वाची  गरज या प्रकल्पातून पूर्ण होत असल्याचे नमूद केले.
क्रिडाईचे प्रांत उपाध्यक्ष राम पुरोहित, गोशिमाचे अध्यक्ष अजित आजारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविकात व्यवस्थापकीय संचालक संतोष कुलकर्णी यांनी ऑथरेकेअरच्या सन १९९१ पासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी क्रिडाईचे राजीव परीख, पुणे जनता बँकेचे अध्यक्ष खळदकर आदी उपस्थित होते.