बालनाटय़ स्पर्धेचे बक्षीस वितरण Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने बालनाटय़ स्पर्धेचा उपक्रम  स्तुत्य आहे, असे उद्गार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बालनाटय़ स्पर्धेच्या बक्षीस वितरण व गणवेश वाटप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती शारदा देवणे होत्या.
या स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे मोठा गट- सांघिक- ल. कृ. जरग विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, ए. पी. स्कूल क्र.३९, उत्तेजनार्थ-महाराणी ताराबाई विद्यालय क्र. २८, माझी शाळा भोसलेवाडी. वैयक्तिक अभिनय- किमया विवेक जोशी (ल. कृ. जरग विद्यामंदिर), गीता बाळासाहेब िशदे ( ए. पी. स्कूल क्र.३९) व इलियास आझम शेख (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय), रोहिणी गोसावी (महाराणी ताराबाई विद्यालय क्र. २८). उत्तेजनार्थ- गौरी सुंदर डवरी (नेहरू विद्यालय), श्वेता भीमराव पाटील (वि. स. खांडेकर विद्यालय). दिग्दर्शन- समीर पठाण (ल. कृ. जरग विद्यामंदिर), सुचित्रा पडळकर (महाराणी ताराबाई विद्यालय क्र. २८). लेखन-श्रीकांत देसाई (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय), युवराज एरूडकर (आंबेडकर विद्यालय).
लहान गट-सांघिक-नेहरूनगर विद्यामंदिर, चाटे स्कूल प्राथमिक, प्रिन्स शिवाजी विद्यालय, उत्तेजनार्थ वसंतराव चौगुले विद्यालय, विद्योदय विद्यालय.
वैयक्तिक अभिनय- अंजली दिलीप माळी (चाटे स्कूल प्राथमिक), दीक्षा युवराज कुंभार (वसंतराव चौगुले विद्यालय), पीयूष जाधव (नेहरूनगर विद्यामंदिर), उत्तेजनार्थ-राखी राजू काळे (साने गुरुजी विद्यालय), साक्षी गणेश लोंढे. दिग्दर्शन-प्रभाकर गुलाब लोखंडे (शिवराज विद्यालय), कुसुमांजली देविदास कदम (प्रिन्स शिवाजी विद्यालय). लेखन-विनोदकुमार गुरुबस भोंग (नेहरूनगर विद्यामंदिर), भगवान लक्ष्मण खिरारी (वसंतराव चौगुले विद्यालय).
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मििलद यादव, चंद्रकांत निफाडे, गोंधळी यांनी काम पाहिले.
या समारंभास प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती जयश्री साबळे, उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.