‘लिटिल इटली’ साखळीतील हॉटेल कोल्हापुरात दाखल Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
इटालियन आणि मेक्सिकन फूडमधील प्रसिद्ध भारतीय चेन ‘हॉटेल लिटिल इटली’ कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल पंचशील येथे  ‘लिटिल इटली’चे हॉटेल शुक्रवारपासून करवीरकरांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. जगभरात इटालियन फूड बनवणारे आम्ही उत्तम भारतीय असल्याचा दावा ‘लिटिल इटली’चे राज मेहता यांनी केला आहे.
‘लिटिल इटली’ भारतातील विविध पुरस्कारविजेते चेन हॉटेलपैकी आहेत. सध्या देशभरात मुंबई-पुणे-दिल्लीसारख्या ‘मेट्रो सिटी’सह एकूण २६ ठिकाणी ही सेवा कार्यरत आहे. ‘लिटिल इटली’मध्ये इटालियन आणि मेक्सिकॅन डिशेस मॉकटेल सोबत दिली जाणार आहेत.