शेतकरी संघर्ष समितीतर्फेशुक्रवारी आंदोलन Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
ऊसदराच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे ९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर महाधरणे आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार संपतबापू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उसाचा वाढता उत्पादन खर्च व महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील शेतकरी ऊसदराच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करीत आहे. मात्र, शासनाने आडमुठी व शेतकरीविरोधी भूमिका घेतली आहे. यामुळे शासन व साखर कारखानदार काहीच बोलत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीतर्फे राज्यपातळीवर ९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या निवेदनावर सुभाष जाधव, नामदेव गावडे, अ‍ॅड. अरुण सोनाळकर, बाबासाहेब देवकर, दिलीप पवार, दिलीपकुमार जाधव, बाजीराव चौगुले, रघुनाथ कांबळे, आबासाहेब चौगुले, समर पवार-पाटील आदींच्या सह्या आहेत.