मनसेचे साळोखे, दिंडोर्ले यांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार Print

कोल्हापूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे व शहराध्यक्ष राहुल िदडोर्ले यांचा मनसे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने  सत्कार समारंभ शाहू स्मारक भवन येथे पार पडला.  
जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे यांनी सर्वसामान्यांसाठी कार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले. शहराध्यक्ष राजू िदडोर्ले यांनी गट-तट व मतभेद विसरून सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून एकदिलाने पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संयोजक प्रसाद पाटील यांनी पक्षातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची व कार्यकर्त्यांची घुसमट थांबली असून, संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्या कर्तृत्वाने नूतन निवडीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याने जोमाने जिल्हाभर संघटनात्मक बांधणी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष नवेज मुल्ला यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता मिळाल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या नवीन संधीमुळे माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा जोमाने पक्ष वाढवेल व जिल्हा ‘मनसे’मय करेल, असे मत व्यक्त केले.   
सत्कार सोहळ्याचे संयोजन शहर उपाध्यक्ष राजू समर्थ, मनजित सराटे, विजय पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहर अध्यक्ष मंदार पाटील, इत्यादींनी केले. स्वागत राजू समर्थ, प्रास्ताविक मनजित सराटे, आभार विजय पाटील यांनी मानले.