माजी सैनिकोंचा खडकीत मेळावा |
![]() |
वाई/वार्ताहर माजी सैनिक , युद्धविधवा, विधवा व अवलंबितांच्या पेन्शन, इसीएचएस, नोकरी आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी संचालक , सैनिक कल्याण विभाग, पुणे व बी ई जी, सेन्टर, खडकी यांच्या विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकोळी ९ वाजता आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) भानुदास जरे यांनी दिली. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी भगत पॅव्हेलियन बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप व सेन्टर, खडकी पुणे येथे मेडिक ल कॅ म्पचे तसेच पेन्शन, इसीएचएस, अशा विविध समस्यांचे निवारण क रण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकोंसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचा लाभ सर्व माजी सैनिक , युद्धविधवा, विधवा यांनी घ्यावा, असेही आवाहन केले आहे. |