जर्मनीतील विद्यापीठाचा ‘डीकेटीई’बरोबर करार Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
आर.डब्ल्यू.टी.एच.अ‍ॅचेन विद्यापीठ, जर्मनीचे डॉ. मोहित ए. रैना यांनी सामंजस्य करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘डीकेटीई’स भेट दिली. वस्त्रोद्योग तंत्रज्ञान शिक्षा आणि संशोधनात डीकेटीई इन्स्टिटय़ूट इचलकरंजी अग्रेसर असून अनेक संस्था आणि विद्यापीठाशी डीकेटीईचा करार झाला आहे.
डॉ. मोहित ए. रैना, प्रोजेक्ट हेड डिव्हिजन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजीज आणि हेड ऑफ इ.यू.रीसर्च कोऑर्डिनेशन तसेच प्रोजेक्ट हेड ऑफ आर. डब्ल्यू. टी. एच. अ‍ॅचेन विद्यापीठ, जर्मनी यांनी शैक्षणिक सामंजस्य करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी डीकेटीईस भेट दिली. त्यांनी डीकेटीईतील ग्रंथालय, कार्यशाळा, यंत्रसामग्री इ.ची पाहणी केली व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधांबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. करारांतर्गत शिक्षणासाठी प्राध्यापकांचा सहयोग, रीसर्च, यासह संयुक्तरीत्या अनेक उपक्रम राबवल्या जाण्यासंबंधीची चर्चा करण्यात आली.
या वेळी इन्स्टिटय़ूटचे प्रा.डॉ. पी. व्ही. कडोले, टेक्स्टाईल विभागप्रमुख प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. एस. जी. कुलकर्णी उपस्थिती होते.