संजय गांधी निराधार योजनेचे सातारा तालुक्यात २९१ अर्ज मंजूर Print

वाई/वार्ताहर
सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितच्या बैठकीत तालुक्यातील ग्रामीण व शहर विभागाचे संजय गांधी निराधार योजनेचे २९१ लाभार्थ्यांचे, श्रावणबाळ योजनेचे ८१ अर्ज व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकोळ निवृत्ती योजनेचे २७ अर्ज मंजूर क रण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुभाष बागडे यांनी दिली.
 सातारा तालुको संजय गांधी निराधार योजना समितची बैठक अध्यक्ष डॉ. अविनाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर रोजी  घेण्यात आली. या बैठकीला ग्रामीण विभागाचे सदस्य शामराव खुशाबा मस्के, अ‍ॅड. नम्रता बिपीन उत्तेक र, अरु ण बाजीराव कोपसे व शहर विभागाचे सदस्य चेतन प्रदीप सोळंकी, अपर्णा खांडेक र, रंजना मोरे, रवींद्र पवार यांच्या उपस्थित होते.
 या बैठकीत हे विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर क रण्यात आले.  समितीपुढे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी कोर्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बँक खाते उघडण्याबाबत पत्र घेऊ न नजीक च्या जिल्हा मध्यवर्ती सहकोरी बँके त खाते उघडून खाते क्र मांक  या कोर्यालयाक डे  देण्यात यावा, असेही आवाहन बागडे यांनी के ले आहे.