कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्यावतीने डिसेंबरमध्ये कला महोत्सव Print

कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीने १ ते ५ डिसेंबपर्यंत होणाऱ्या कला महोत्सवात प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी कलाकारांनी माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
या महोत्सवात चित्र-शिल्प प्रदर्शन, कलाविषयक फ़िल्म-शो, व्याख्यानमाला, बालचित्रकला स्पर्धा होणार आहेत. कलाकृतींची विक्रीसाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. यासाठी शाहू स्मारक भवन व त्या शेजारील मैदानात व्यवस्था करण्यात येणार आहे.  यानिमित्ताने कोल्हापूरच्या कलाकारांसंबंधी स्मरणिका प्रसिद्ध  होणार असून त्यासाठी कलाकारांनी फोटो, कलाकृतीचा फोटो, बायोडाटासह पूर्वी केलेल्या कलाकृतींची सी.डी. १५ नोव्हेंबपर्यंत जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, अिजक्यतारा, ताराबाई पार्क यांच्याकडे जमा करावी. अधिक माहितीसाठी कार्यवाह रियाज शेख, समन्वयक प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.