दगडफेकप्रकरणी हाळवणकर यांच्यासह १५ जणांची मुक्तता Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
आवाडे टेक्स्टाईलवर दगडफेक केल्याप्रकरणी आ.सुरेश हाळवणकर यांच्यासह १५ जणांना पुराव्याअभावी निदरेष मुक्त केले. इचलकरंजी  येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.
२००४ मध्ये वस्त्रोद्योगाला केंद्र सरकारने सॅन व्हॅट कराच्या  विरोधात शहरात यंत्रमागधारकांनी आंदोलन केल्याने महिनाभर वस्त्रोद्योग बंद होता. बंद काळात खंजिरे औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या आवाडे टेक्स्टाईल मिलवर जमावाने दगडफेक केली. पोलिसांनी आ. सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, राजगोंडा पाटील, धनपाल टारे, सतीश कोष्टी, नाराया हिरुगडे, गिरी जॉबर, आनंदा नेमिष्टे, पांडुरंग म्हातुगडे, पुंडलिक जाधव, विश्वनाथ अग्रवाल यांच्यावर गुन्हे दाखल केले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्वाना सबळ पुराव्याअभावी निदरेष सोडले.  अ‍ॅड. स्वामी यांनी १५ जणांतर्फे काम पाहिले.