विनयभंग करणाऱ्यास अटक Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
येथील विक्रमनगरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरारी झालेल्या आरोपीला गावभाग पोलिसांनी जमखंडी तालुक्यातील तेरदाळ येथे अटक केली. बसवराज हुनशाळ असे त्याच नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.
विक्रमनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाची चहाची टपरी आहे. ४ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे ते पहाटे उठून चहाच्या टपरीवर निघून गेले होते. पूर्वी चहाच्या टपरीवर काम करणारा बसवराज हुनशाळ या कामगाराने चहाच्या टपरीवाल्याच्या बंद घराचे दार उघडून घरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर हुनशाळ फरारी झाला होता. त्यानुसार गावभाग पोलीस ठाण्यात हुनशाळ याच्या विरोधात फिर्याद दाखल झाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा कसून तपास सुरू ठेवला होता. घटना घडल्यापासून आरोपी बसवराज हा जमखंडी तालुक्यातील तेरदाळ येथे आपल्या सासरवाडीत वास्तव्यास असल्याची वार्ता पोलिसांना समजली. त्यानुसार गावभाग पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती, पोलीस नाईक पी.वाय पाटील आणि पोलीस पथकाने
बसवराज हनशाळ यास तेरदाळ येथे सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री अटक केली. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता ९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.