दौलत कारखाना सुरू होण्यासाठी शरद पवारांबरोबर चर्चा Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
दौलत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय व्हावा यासाठी  त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, नरसिंगराव पाटील यांनी भेट घेतली. भेटीमध्ये दौलत कारखाना सुरू होण्यास आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दौलत सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या सर्व कर्जाची सविस्तर माहिती व वीज पुरवठा केलेल्या संस्थांचे अधिकारी व्यक्तींनाी दिल्लीला घेऊन येण्यास पवार यांनी पुणे येथील भेटीत सांगितले होते. पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, नरसिंगराव पाटील, पं.स.चे सदस्य शांताराम पाटील, सुरेशराव चव्हाण-पाटील, जिल्हा बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्यासह चंदगड तालुक्यातील मुख्य कार्यकर्ते, दौलतचे सर्वेसर्वा गोपाळराव पाटील व दौलतचे चेअरमन अशोक जाधव, अशोक जाधव, व्हा. चेअरमन संजय पाटील आदींनीही पवार यांची भेट घेतली. दौलत विषयी चर्चा सकारात्मक झाल्याचे  भरमुआण्णा पाटील यांनी सांगितले.