दूधगंगा-वेदगंगा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के बोनस Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
 बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सह साखर कारखान्याच्या सर्व ७६४ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २८ टक्के बोनस, तर २०११ गळीत हंगामास आलेल्या उसाला १०० रुपयांचा तिसरा अँडव्हान्स दिवाळी सणासाठी जमा करण्यात आला आहे. आजअखेर सभासदांना २२५० रुपये जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ. के. पी. पाटील यांनी दिली. बोनस रकमेपोटी कारखान्याकडून कर्मचाऱ्यांना २ कोटी ८८ लाख ८ हजार ३५० रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
कायम हंगामी व रोजंदारी असे ७६४ कर्मचारी आहेत. त्यातील ४२७ कर्मचाऱ्यांना १ कोटी ९३ लाख ३९ हजार ३५७ रुपये तर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ३ लाख ८४ हजार ६१८ रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येणार आहे. कारखान्याने अपेक्षित बोनस जाहीर केल्याबद्दल छत्रपती शाहू साखर कामगार संघटनेने समाधान व्यक्त केले.
कामगारांच्या वतीने अध्यक्ष के.पी.पाटील, उपाध्यक्ष ए. पाटील व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.