‘चोसाका’ची निवडणूक डिसेंबरमध्ये शक्य Print

चोपडा
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कारखान्याच्या सहकारी सोसायटी गटातील ५६ संस्थांचे मतदार प्रतिनिधी ठराव संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
संचालकांच्या २२ जागा असून १५ जागा उत्पादन गटातून तर सात जागा विविध राखीव गटांतील आहेत. उत्पादक गटात केवळ दीड ते दोन हजार मतदार आहेत. ११ हजारांवर सभासद बिगर कर्जदार गटात आहेत. चोसाकावर सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा झेंडा आहे. परिवर्तन पॅनलच्या नऊ जागा निवडून आल्या होत्या. माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कारखान्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व परिवर्तन असा नवीन गट निर्माण झाला आहे.