भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकात स्वतंत्र बॉम्बशोधक पथक Print

स्थानकातच कार्यालय उभारणार
 जळगाव / वार्ताहर
अतिरेकी तसेच देशविघातक शक्तींकडून धोक्याच्या पाश्र्वभूमीवर भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकासाठी शासनाकडून स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकास मंजुरी मिळाली असून त्यासाठी स्थानक परिसरातच कार्यालय उभारले जाणार आहे.
सद्यस्थितीत जिल्हा स्तरावरच बॉम्बशोधक व नाशक पथक असल्याने रेल्वेसह सर्वच विभागांना त्यावर अवलंबून राहावे लागते. भुसावळ स्थानकावर बऱ्याचदा काही संशयास्पद वस्तू आढळून आल्यावर रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडते. रेल्वे सुरक्षा बल त्यासाठी अडचणींवर मात करून आपली जबाबदारी पार पाडते. भुसावळ जंक्शन असल्याने प्रवासी गाडय़ांसह मालवाहतूक करणाऱ्या शेकडो गाडय़ांचा थांबा आहे. हजारो प्रवाशांची चढ-उतार या ठिकाणी होते.
नागपूर बॉम्बशोधक व नाशक पथकातील काही कर्मचारी भुसावळसह नांदेड व मनमाड येथे पाठविण्यात येणार आहेत.