अनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविणार - विनोद तावडे Print

चोपडा
राज्यातील अनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली. तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील अनुदानित आश्रमशाळेचे अध्यक्ष राजेंद्र पी. सोनवणे यांनी राज्यातील आश्रमशाळांच्या विविध समस्यांचे लेखी निवेदन तावडे यांना सादर केले होते. त्या अनुषंगाने तावडे यांनी ग्वाही दिली. निवेदनात सोनवणे यांनी आश्रमशाळांची वेळ ११ ते पाच करण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी वरिष्ठ लिपिक, स्वयंपाकी, कामाठी, आरोग्य सेवक या पदांना मंजुरी देण्यात यावी, अनुदानित आश्रमशाळांना स्त्री अधीक्षिका, पहारेकरी, सफाई कामगार आदी पदांना मान्यता देण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.