चोपडा तालुका शेतकरी सूत गिरणी लवकरच सुरू Print

निर्यातीसह विविध परवाने प्राप्त
चोपडा
शहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीला निर्यातीसह विविध परवाने प्राप्त झाले असून बांधकाम तसेच प्रशासकीय कामांना वेग आल्याने गिरणी लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली.
निर्यात परवान्यासह इतर १० प्रकारचे परवाने या सूत गिरणीला मिळाले आहेत. उपाध्यक्ष संजय जैन व संचालक मंडळाच्या सहकार्याने सूत गिरणी बांधकाम व प्रशासन क्षेत्रात कार्यरत आहे. २०१३-१४ वर्षांत सूत गिरणी सुरू होऊन उत्पादनास सुरुवात होईल. शेतकऱ्यांचा शेतीमाल व मुख्य पीक कापसाला चांगला भाव देण्यासाठी सहकारी तत्त्वावर हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी खात्री असल्याचे पाटील यांनी सांगितले.