धुळे तालुका तालीम संघ अध्यक्षपदी संजय गिरी Print

धुळे / वार्ताहर
तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कुस्तीपटू संजय गिरी तर सचिवपदी गणेश टाकूर यांची एकमताने निवड करणात आली.
माती आणि गादी (मॅट) वरील आधुनिक कुस्तीचे धडे देवून उमद्या कुस्तीगिरांचा सराव करून घेण्याची गरज अध्यक्ष गिरी यांनी निवड झाल्यानंतर व्यक्त केली. येथील शासकीय विश्रामगृहात धुळे जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली धुळे तालुका तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रदीप बोरसे, बाबा कोळी, रवींद्र माळी, दतू थोरात, गजेंद्र अंपळकर, सचिव गणेश ठाकूर, सहसचिव गणेश फुलपगारे, राजेंद्र बारी, कृष्णा शिंदे, बापू सावंत, खजिनदार ज्ञानेश्वर बुवा, संघटक अनिल अवधूत, संजय वाडेकर, ईश्वर पवार, महेश बोरसे, राम सोनवणे,   तांत्रिक अधिकारी व पंचप्रमुख देवकर गवळी, त्रिलोक गुंडलेकर, प्रसिद्धी प्रमुखपदी अजय भदाणे यांचा समावेश आहे.
तसेच धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुनील महाले व जालिंधर जाधव यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव सुनील चौधरी यांनी दिली.