क्रीडास्पर्धामध्ये हातेडबुद्रुक आश्रमशाळेचे यश Print

चोपडा
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने हातेडबुद्रुक येथे आयोजित केंद्रस्तरीय वाघझिरा विभागाच्या क्रीडा स्पर्धामध्ये ११ आश्रमशाळांनी सहभाग घेतला. साहाय्यक प्रकल्प अधिकारी ए. डी. माळी यांच्या हस्ते क्रीडास्पर्धाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे, मुख्याध्यापक गोविंदा महाजन, हातेडबुद्रुकचे सरपंच मनोज सनेर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी शाळेचा प्रगतीचा आढावा मांडला. केंद्रप्रमुख एल. बी. चौधरी यांनी वाघझिरा केंद्राच्या क्रीडा प्रगतीचा अहवाल सादर केला. या स्पर्धामध्ये हातेडबुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. आश्रमशाळेच्या यशस्वी खेळाडूंमध्ये १०० मीटर धावणे- विक्रम पावरा, मंगला पावरा, देवीलाल पावरा, प्रियंका पावरा, २०० मीटर धावणे प्रथम - सुमित्रा बारेला, ज्योतीबेन पावरा, ४०० मीटर- संदीप पावरा, मोतीलाल पावरा, जनादी पावरा, ८०० मीटर- कल्पना पावरा, १५०० मीटर - अनिता पावरा, ३००० मीटर- इमारत पावरा, गोळाफेक- रंजना पावरा, जनादी पावरा, भालाफेक - प्रथम - राकेश बारेला, सविता पावरा, थाळीफेक प्रथम - सुमित्रा बारेला, सविता पावरा, लांबउडी प्रथम - सुमित्रा बारेला, अनिल पावरा, प्रियंका पावरा, उंच उडी - प्रथम - मुकेश बारेला, शकुंतला पावरा, अनिल पावरा, प्रमिला पावरा यांचा समावेश आहे. तहसीलदार नितीन गवळी यांच्या हस्ते विजेत्या संघाला फिरती ढाल देऊन गौरव करण्यात आला.