त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि! Print

‘मराठी विज्ञान परिषद’
(संकलन - सुचिता देशपांडे), रविवार, २३ सप्टेंबर २०१२
‘१९५७ साली रशियाने अवकाशात स्पुटनिक उडवला. तो कसा बनवला, कसा उडवला, का उडवला असे अनेक प्रश्न सामान्य व्यक्तींच्या मनात रेंगाळत होते. मात्र याची नेमकी उत्तरे कोणाला देता येत नव्हती. १९६२ साली चीनने आणि १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.

त्यावेळी रणगाडे व इतर शस्त्रास्त्रांबद्दलचे उल्लेख वर्तमानपत्रात यायचे, पण ते कुठे बनवले, कसे चालतात, त्यात कोणता दारूगोळा टाकतात, आपल्याकडे तसे काही बनते का, याची माहिती देणारे आपल्याकडे कोणी नव्हते. १९५५ सालापासून भारतात अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली. १९५८ साली भारताने अमेरिकेशी पीएल-४८० करार करून धान्य आयात करायला सुरुवात केली. पण पूर्ण पसे अदा करूनही अमेरिका आपल्याला निकृष्ट धान्य पाठवीत असे. यातून सुटका व्हावी म्हणून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मंत्री सी. सुब्रमण्यम आणि शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या मदतीने नॉर्मन बोरलाग यांनी शोधलेल्या मेक्सिकन गव्हाची लागवड देशभर करून हरित क्रांतीची सुरुवात करून दिली. ही हरित क्रांती म्हणजे काय, ती कशासाठी याची उत्तरेही लोकांना मिळत नव्हती. कारण त्यावेळी समाजात गायनशाळा आणि साहित्य संस्था होत्या, पण विज्ञान विषयावर माहिती देणाऱ्या अधिकारी व्यक्ती नव्हत्या. हे ओळखून भारताच्या सर्व राज्यांत विज्ञान परिषदा स्थापन झाल्या- स्वयंस्फूर्तीने.. ’ मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेबाबत माहिती देताना संस्थेचे जुनेजाणते पदाधिकारी अ. पां. देशपांडे सांगत होते.
महाराष्ट्रात मुंबईत-मराठी विज्ञान परिषद, केरळात केरळ शास्त्र साहित्य परिषद, कर्नाटकात- कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, दिल्लीत- दिल्ली सायन्स फोरम, बंगालमध्ये -पश्चिम बंग विज्ञान परिषद वगरे संस्था स्थापन झाल्या. महाराष्ट्रात १९६६ साली सुरू झालेल्या या संस्थेच्या शाखांसाठी गावोगावहून मागणी आली. आजमितीला महाराष्ट्रात ७० ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, बेळगाव आणि निपाणी येथे परिषदेच्या शाखा आहेत.
अनेक सामाजिक समस्यांचा संबंध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजात न झिरपलेल्या विज्ञानविषयक जाणिवांशी असतोच असतो. हे एकदा पटले की विज्ञानप्रसाराचे काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचे मोल उमजते. मराठी विज्ञान परिषद ही अशीच एक संस्था. एखादा कार्यक्रम उरकणे आणि एखादा उपक्रम सातत्याने करत राहणे यातला नेमका भेद जाणून alt

विज्ञानविषयक उपक्रम सातत्याने राबवणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून मराठी विज्ञान परिषदेचा- ‘मविप’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दैनंदिन जगण्यात विज्ञानाचे उपयोजन का आणि कसे आवश्यक आहे, याचा नेमका धागा आपल्याला ‘मविप’च्या विविध उपक्रमांमध्ये सापडतो. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे आणि विज्ञान मांडण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे हे मराठी विज्ञान परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विज्ञानाचे जीवनातील महत्त्व वाढवणे आणि समाजाची वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे याकरिता ‘मविप’तर्फे शहरी तसेच ग्रामीण भागांत विविध उपक्रम राबवले जातात. दैनंदिन जगण्याशी संबंधित असे अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन ‘मविप’तर्फे केले जाते. सर्वसामान्य व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘मविप’चे विविध उपक्रम आहेतच, त्याचबरोबर अंध आणि मूकबधिरांसाठीही परिषदेचे अनेक उपक्रम आहेत.
 ‘मविप’तर्फे विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. त्यात सौरऊर्जा वर्ग, शहरी शेती, मला आवडलेले पुस्तक उपक्रम, खगोलशास्त्रीय घटनांशी संबंधित विविध उपक्रम, एड्सची माहिती देणारा दृक् श्राव्य कार्यक्रम, ‘वयात येताना..’ हा पौगंडावस्थेतील मुलांसाठी देणारा माहितीपर कार्यक्रम, विज्ञान परीक्षा आणि सुटीतील विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे. ‘मविप’तर्फे सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात बालोद्यान (इयत्ता पहिली ते चौथीसाठी), विज्ञान खेळणी (इ. तिसरी ते पाचवी) आणि विज्ञान खेळणी (इ. सहावी ते दहावी) असे गटनिहाय उपक्रम असतात. हे कार्यक्रम दोन दिवसांचे असतात. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजीतून संकल्पना विकसन’ हा चारदिवसीय कार्यक्रम संस्थेतर्फे योजला जातो. सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून प्रयोग सराव वर्ग घेतले जातात. सातवी ते नववीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मविप’तर्फे विज्ञान परीक्षा घेतली जाते.
विज्ञानविषयक सृजनशीलता जोखण्यासाठी ‘मविप’तर्फे विविध पुरस्कार दिले जातात आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात विज्ञान संशोधन पुरस्कार, बाल विज्ञान वाङ्मय पुरस्कार, विज्ञान निबंध स्पर्धा यांचा समावेश आहे. परिषदेतर्फे तीन विज्ञान संशोधन पुरस्कार दिले जातात. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दिला जातो. ही स्पर्धा वयाने २५ वर्षांहून कमी असणाऱ्या, शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु पदवीधारक नसलेल्या सर्वासाठी खुली असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने महाविद्यालयीन शिक्षण घेऊ न शकलेले युवक/युवतीसुद्धा यावर्षीच्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. विज्ञान वा तंत्रज्ञानातील कोणत्याही शाखेशी संबंधित असा कोणताही संशोधनात्मक प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो.
समाजात विज्ञानाबद्दल जागरूकता आणि जाणिवा निर्माण करणे, तसेच संस्थेच्या कामामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग मिळवणे अशा पद्धतीने परिषदेतर्फे अनेक उपक्रम सुरू आहेत. अशा पद्धतीने गेली ४६ वष्रे लोकशिक्षणाचे मोलाचे काम करणाऱ्या alt
मराठी विज्ञान परिषदेला केंद्र सरकार, राज्य शासन, मुंबई महानगरपालिका अथवा कोणत्याही जिल्हा परिषदेकडून निर्वाह अनुदान मिळत नाही. परिषद मध्यवर्तीच्या कामासाठी लागणारे पसे मुंबईत जमा करते. ही रक्कम दरवर्षी ६० ते ७० लाख एवढी असते. मात्र वाढता खर्च व परिषदेच्या दुमजली वास्तूची देखभाल पाहण्यासाठी ही रक्कम तुटपुंजी पडते. यावर उपाय म्हणून परिषदेकडे १० कोटी रुपयांचा कायमचा निधी असणे अत्यावश्यक ठरते. निधीअभावी गेली २३ वर्षे परिषदेत काम करणाऱ्या पूर्णवेळ काम पाहणाऱ्या पदवीधर कार्यकर्त्यांलाही पाच ते दहा हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन देणे आज परिषदेला परवडत नाही. परिषदेचे सर्व बाजूंनी विस्तारलेले कार्य करण्यासाठी सध्याची दुमजली वास्तूही अपुरी पडते. त्यासाठी सहा मजली हरित इमारत बांधायचा संस्थेचा विचार होता. मात्र त्यासाठी लागणारी सात कोटी रुपयांची रक्कम काही जमेना. खूप प्रयत्न केल्यानंतर गेल्या तीन वर्षांत फक्त सव्वा कोटी रुपये जमल्याने आता तीन कोटी रुपये खर्च करून संस्थेचा एकच मजला वाढवायचे निश्चित करण्यात आले आहे. यात दीड कोटी रुपये एका वाढीव मजल्यासाठी, ५० लाख रुपये सध्याच्या दोन मजल्यांची पुनर्रचना करण्यासाठी, ५० लाख रुपये सहा मजल्यांसाठीच्या कॉलम उभारणीसाठी आणि ५० लाख रुपयांच्या व्याजातून महानगरपालिकेचे वाढीव मजल्यावरील कर भरता येईल, अशी संस्थेची योजना आहे.
‘मविप’तर्फे पुस्तकांपलीकडच्या विज्ञानाची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण करून भावी संशोधक घडविण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात तसेच सर्वसामान्यांच्या दिनक्रमात विज्ञान कसे डोकावते, हे विशद करण्यासाठी विज्ञानशिक्षणाचा जागरही केला जातो. अशा दोन्ही स्तरांवर काम करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी मदतीचे हात पुढे येण्याची नितांत आवश्यकता आहे.     

विज्ञान संकल्पना अभ्यासक्रम
विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातील विज्ञानविषयक संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट व्हाव्यात, म्हणून आखलेला हा अभ्यासक्रम आहे. यात प्रत्येक संकल्पनेवर पाचेक प्रयोग केले जातात, प्रकल्प केले जातात, फिल्म शो दाखवला जातो, कधी निसर्गात जाऊन त्यावर आधारित संदर्भाची ओळख करून दिली जाते.
विज्ञान अधिवेशन
‘मविप’तर्फे वर्षभरात  जे विविध उपक्रम राबवले जातात, त्यात प्राधान्याने उल्लेख करावा लागेल तो सर्वासाठी खुल्या असलेल्या विज्ञान अधिवेशनाचा. १९६६ सालापासून प्रत्येक वर्षी घेण्यात येणाऱ्या या विज्ञान अधिवेशनात अध्यक्ष म्हणून नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञांची निवड परिषदेतर्फे केली जाते. या अधिवेशनादरम्यान विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येतो. अधिवेशनादरम्यानच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात परिसवांद, व्याख्याने, कथाकथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप आदींचा समावेश असतो. हे अधिवेशन राज्याच्या ज्या भागात आयोजित करण्यात येते, त्या भागातील पर्यावरणीय, भौगोलिक, वैज्ञानिक वैशिष्टय़े लक्षात घेऊन अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते.
विज्ञान प्रयोग मेळावे
मराठी विज्ञान परिषदेने घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून प्रयोग कसे करायचे ते तंत्र विकसित केले आहे. त्या आधारे विज्ञानाची तीच तत्त्वे नीट समजावून घेता येतात. अनेक शाळांमधील मुले मराठी विज्ञान परिषदेत येऊन प्रयोग करून जातात. अनेक शाळाही अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात. इ. सहावी आणि इ. नववीत होमी भाभा विज्ञान परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग कसे करायचे, याची अधिक माहिती परिषदेत मिळते. त्यात विद्यार्थ्यांना प्रयोग म्हणजे काय, कोणती उपकरणे यासाठी वापरली जातात, ती कशी हाताळायची, प्रयोगात निरीक्षणे कशी करायची, निष्कर्ष कसे काढायचे ही प्रयोग पद्धती शिकवली जाते.
कोशवाङ्मय
मराठीमध्ये ८५० च्या वर कोश उपलब्ध आहेत. एवढय़ा संख्येचे कोश अन्य भारतीय भाषेत नाहीत. गेल्या दहा वर्षांत परिषदेने राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, केंद्र सरकारची विज्ञान प्रसार ही संस्था यांच्याबरोबर संयुक्तपणे काम करून शाळांसाठी विज्ञान संकल्पना कोश, सर्वासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, वैज्ञानिकांचा चरित्र कोश, १८३० ते १९५० मधील मराठीतील विज्ञान लेखन असे चार कोश प्रकाशित केले.
परिषदेचे संदर्भालय
‘मविप’चे पूर्णपणे संगणकीकृत आणि फोटो कॉपिंगची सुविधा असलेले संदर्भालय आहे. या संदर्भालयात मराठी व इंग्रजी भाषेतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सुमारे साडेचार हजार पुस्तके उपलब्ध आहेत. यांत भारतीय सरिता कोश, कृषिज्ञान कोश व विश्वकोश यासारख्या संदर्भ कोशांचाही समावेश आहे. संदर्भालयातील सुमारे साडेतीनशे पुस्तके ही दुर्मीळ स्वरूपाची आहेत. हे संदर्भालय सभासदांसाठी मंगळवार ही परिषदेची साप्ताहिक सुटी वगळता रोज ११ ते ५ या वेळात खुले असते. परिषदेच्या संदर्भालयात विविध विषयांवरची आठ प्रदशर्ने उपलब्ध असून ती शाळांना व संस्थांना सशुल्क दिली जातात. परिषदेचे डॉ. रामभाऊ म्हसकर सी.डी. संग्रहालय असून त्यात विविध वैज्ञानिक विषयांवरील सुमारे ३०० सी.डी. उपलब्ध आहेत. या सी.डी. शुल्क भरून घरी नेता येतात. यातील बहुतांश सी.डी. या इंग्रजी भाषेतील असल्या तरी काही सी.डी. मराठी भाषेतही आहेत.
शहरी शेती
घरातील ओला कचरा वापरून शहरी शेती हा उपक्रम कसा राबविता येईल, याविषयी परिषदेतर्फे मार्गदर्शन केले जाते. दरमहाच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या या मार्गदर्शन उपक्रमाचा लाभ आजवर सहा हजार ते सात हजार व्यक्तींनी घेतला. राज्यातील गृहनिर्माण सोसायटय़ांच्या गच्चीवर असा बगीचा जर निर्माण झाला तर घरोघरचा ओला कचरा नगरपालिकांना बाहेर न्यावा लागणार नाही व महागडय़ा भाज्या बाहेरून विकत घ्याव्या लागणार नाहीत. कारण त्या गृहनिर्माण संस्थेतच पिकवल्या जातील व प्रत्येक दोन ते तीन गृहनिर्माण संस्थेमागे एका माळ्याला कामही मिळेल. या माळ्याचा पगार भाजी खरेदीच्या किमतीपेक्षा अधिक होणार नाही. अशा बगीचामुळे गच्ची गळत नसल्याचा परिषदेचा गेल्या १७ वर्षांचा अनुभव आहे.
मुला-मुलींसाठी लंगिक शिक्षण
वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी मुले-मुली वयात येतात. त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होतात. त्यामागची कारणे, परिणाम हे मुलांना उमजत नाहीत. मात्र त्याबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता मुलांमध्ये असते. त्यासंबंधी मुलांना शास्त्रीय माहिती मिळावी, याकरिता ‘वयात येताना..’ या विषयावरील मार्गदर्शन वर्ग परिषदेने सुरू केले आहेत. याअंतर्गत मुलींना- ‘मुलगी वयात येते’ आणि मुलांना- ‘मुलगा वयात येतो’ हे स्लाइड शो दाखवले जातात. आजवर या विषयावर परिषदेकडून हजारो मुले व त्यांच्या पालकांना शास्त्रीय शिक्षण मिळाले आहे. यासंबंधीच्या सीडी व डीव्हीडी परिषदेत मराठी व इंग्रजीतून उपलब्ध आहेत.
सोमवारच्या अंकात : संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, जि. अमरावती

धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते :
मुंबई- एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी : ६७४४०२१४.
ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा,  दूरध्वनी :२५३९९६०७.
पुणे- दि इंडियन एक्स्प्रेस लि., ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी : ०२०-६७२४१०००.
नागपूर- लोकसत्ता, १९, ग्रेट नाग रोड, दूरध्वनी : ०७१२-२७०६९२३.
नाशिक- लोकसत्ता, ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, दूरध्वनी :२३१०४४४
अहमदनगर- लोकसत्ता, आशीष, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड, दूरध्वनी : २४५१५४४/२४५१९०७.
औरंगाबाद- लोकसत्ता, मालपानी-ओबेरॉय टॉवर्स, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी : ०४०-२३४६३०३.

परिषदेशी जोडले गेलेले वैज्ञानिक
डॉ. भा. मा. उदगावकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर हे परिषदेचे पूर्वाध्यक्ष आहेत. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे पूर्वाध्यक्ष व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेले  प्रभाकर देवधर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर हे परिषदेचे विश्वस्त आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि डॉ. रघुनाथ माशेलकर हे परिषदेच्या वार्षकि अधिवेशनाचे पूर्वाध्यक्ष आहेत, तर डॉ. विजय भटकर हे वार्षकि अधिवेशनाचे उद्घाटक होते. याशिवाय असंख्य वैज्ञानिक परिषदेशी जोडले गेलेले आहेत.

मराठी विज्ञान परिषदेला पाठविण्याचे धनादेश मराठी विज्ञान परिषद (Marathi Vidnyan Parishad)  या नावे पाठवावेत. संस्थेला देण्यात येणाऱ्या देणग्यांवर ८०-जीनुसार करसवलत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - दूरध्वनी: ०२२-२४०५४७१४, ०२२-२४०५७२६८ फॅक्स : ०२२-२४०५७२६८, संकेतस्थळ: www.mavipamumbai.org ई-मेल: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it पसे तुमच्या बँकेतून मराठी विज्ञान परिषदेच्या ‘ स्टेट बँक ऑफ इंडिया, स्वस्तिक पार्क, चेंबूर शाखा, एस. एच. कलानी मार्ग, चेंबूर, मुंबई- ४०००७१, खाते क्र. १०७८१७६९५१७, IFS SBIN ०००७१९२ पाठविता येतील. कोणत्याही मार्गाने पसे पाठविले तरी देणगीदाराने मराठी विज्ञान परिषदेस एक पत्र पाठवावे, म्हणजे त्यांना पावती व देणगीवरील निम्म्या पशांवर मिळणाऱ्या सवलतीसाठी आयकर विभागाचे ८०-जी प्रमाणपत्र पाठविता येईल.
परदेशात स्थायिक झालेल्यांनाही मराठी विज्ञान परिषदेला पसे पाठवता येतात. त्यासाठी लागणारे भारत सरकारचे FCRA  सर्टिफिकेट परिषदेकडे आहे. मात्र असे पसे पाठवताना ते स्टेट बँकेतील खाते क्र.१०७८१७६९५४० या खात्यावर पाठवावेत. त्यासाठी स्विफ्ट क्रमांक लागतो. तो असा- SWIFT No. SBI NINBB ५१४

रु. १०००/- वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या देणग्या देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.