Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
( २१ ते २७ ऑक्टोबर २०१२)
मेष : इभ्रतीला धक्का नाही
गुरू-शनीचा आधारच विजयादशमीचे उपक्रम पूर्ण करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अष्टमात मंगळ, राहू आणि बुध शुक्राची राश्यांतर धावपळ, घाईगर्दी, अडचण असे प्रसंग निर्माण करणार असले तरी इभ्रतीला धक्का बसू शकणार नाही. सूर्य-नेपच्यून, नवपंचम योग अनपेक्षित संधीतून आपणास पुढे घेऊन जाणार आहे. नोकरी, धंदा, राजकारण, शिक्षण या विभागातील मेष व्यक्तींना त्याची प्रचीती शनिवापर्यंत येईल.
दिनांक : २२ ते २६ प्रचीतीचा काळ.
महिलांना : समस्यांच्या गर्दीतून कार्यभाग साधावा लागेल. विजयादशमी मात्र आनंद देईल.
वृषभ : प्रभाव प्रबळ होईल
राशिस्थानी असलेल्या गुरूचा प्रभाव बुध शुक्राच्या राश्यांतरातून प्रबळ होईल. नवीन उपक्रमांचा प्रारंभ त्यांना मिळणारा प्रतिसाद विजयादशमीचा शुभारंभ यातून वृषभ व्यक्तींची कार्यप्रांतातील भ्रमंती वेगवान होईल. परिवार ते व्यापार यामध्ये प्रसन्नता राहील आणि रवी-शनी सहयोग मंगळ-राहू एकत्र याच्या विरोधातील प्रखरता कमी होत राहील. कला, साहित्य, विज्ञानात चमकाल, रवी-नेपच्यून नवपंचम योग धर्मकार्यातून आनंद देतो.
दिनांक : २२ ते २६ शुभ काळ.
महिलांना : संधी सफलता देतील आणि विजयादशमी आपणास गाजवता येईल.
मिथुन : प्रश्न गर्दी करतील
मिथुन व्यक्तींवर राशी कुंडलीतील बरेच ग्रह नाराज असल्याने व्यवहाराची समीकरणे अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरत नाही. प्रश्न गर्दी करतात, कार्य अडचणीत सापडतात. असे प्रसंग नाराज गुरू-राहू-मंगळ यांच्यातून येतात. बुधाचे राश्यांतर तणाव व्यापक करते. पंचमात शनी आणि चतुर्थात येणारा शुक्र प्रयत्न आणि उत्साह संरक्षणात ठेवणार असल्याने समीकरणे विलंबाने पण आपल्या पद्धतीने मार्गावर आणता येतील.
दिनांक : २४ ते २७ शुभ काळ उपयुक्त ठरेल.
महिलांना : ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हा मंत्र शनिवापर्यंत कृतीत ठेवा.
कर्क : निर्णय सरळ ठेवा
गुरूची कृपा, पंचमात राहू आणि बुध शुक्राची अनुकूल राश्यांतर निर्णय घेऊन यशस्वी ठरणारी कृती शनिवापर्यंत कर्क व्यक्तींचा प्रभाव व्यापक करीत राहील. विजयादशमी बुध शुक्राचा शुभयोग प्रसन्न घटनांची केंद्रस्थान ठरतील. व्यापारी तेजी-मंदी, ठरवलेले करार, नवीन योजनांचे प्रस्ताव, राजकीय संपर्क, अर्थप्राप्ती, नोकरीतले अधिकार असे विभाग प्रभावात येतील याचे मात्र विस्मरण नको.
दिनांक : २२, २३, २६, २७ शुभ काळ.
महिलांना : संसार, समाजकार्ये, कलाप्रांत यात कार्यचित्र आकर्षक कराल, त्याने प्रतिष्ठा वाढेल.
सिंह : उपक्रम वेग घेतील
रविवारी चंद्राचे बुध-शुक्र शुभसंबंध निर्माण होतील आणि विजयादशमीच्या उपक्रमांना वेग देता येईल. त्यात गुरूकृपा यश मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. चतुर्थात मंगळ-राहू एकत्र असेपर्यंत कार्यमार्ग गुप्त ठेवणे आणि कृती सुरू ठेवणे, गुरूकृपा त्यामुळे अधिक प्रबळ करता येईल. नोकरीत बदल संभवतात. व्यापारात नवे तंत्र यश देईल. परिवारातील प्रश्न सुटतील, रवी-नेपच्यून नवपंचम योग धर्मकार्यात चमत्काराचा असतो.
दिनांक : २१, २४, २५ शुभ काळ.
महिलांना : प्रपंचातले प्रश्न सुटतील, समाजात चमकाल.
कन्या : यशस्वी होता येईल
रवी-शनी सहयोग, मंगळ राहू एकत्र यांच्यातील बरेचसे परिणाम त्रासदायक ठरतात, कटकटी करतात. संशय येताच थांबा, संपताच पुढे चला. गुरूकृपा आणि बुध-शुक्राची राश्यांतर प्रयत्न आणि उत्साहाच्या समन्वयातून विजयादशमीच्या कार्यक्रमात यश देतील, कार्यवर्तुळातील प्रतिष्ठा सांभाळतील. गुरुवारच्या बुध-शुक्र शुभयोगाच्या आसपास व्यापार, राजकारण, कला प्रांतातील योजना प्रतिसाद मिळवू शकतात.
दिनांक : २२, २३, २६, २७ शुभ काळ
महिलांना : अवघड प्रवास पूर्ण कराल आणि श्रेष्ठत्व सिद्ध कराल. विजयादशमी प्रसन्न राहील.
तूळ : यश मिळणे अवघड
साडेसाती, रवी-शनी सहयोग, अष्टमात गुरू-केतू अशा ग्रहकाळात यश मिळवणे एक परीक्षाच असते. आपण असाल त्या प्रांतात याचा प्रत्यय येत राहील. साहस, स्पर्धा टाळा, शासकीय नियम सांभाळा, नवीन उपक्रमात सावध राहा, नवरात्रातील योजनांना आकार देता येईल. त्यातून परिवारातील प्रश्न सुटतील. बाजारपेठेतील उपक्रम सुरू राहतील. परंतु मिजास, मस्ती यावेळी कोठेही उपयुक्त ठरणार नाही.
दिनांक : २१, २४, २५ शुभ काळ.
महिलांना : नवरात्र प्रसन्न राहील आणि सांसारिक, सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळेल.
वृश्चिक : समन्वय सोपा होईल
व्ययस्थानी रवी शनी, प्रथम भावात राहू, मंगळ यांच्यातील संघर्ष सफलता आणि परिश्रम यांचा समन्वय अवघड करतो. निर्धाराने आणि हुशारीने पुढे चालत राहा. गुरूचे सहकार्य बुध-शुक्राची राश्यांतर अवघड समन्वय सोपा करण्यास उपयुक्त ठरतील. विजयादशमी नवे संपर्क, नव्या कल्पना यातून यश देणारी आहे. गुरुवारचा बुध-शुक्र शुभयोग आर्थिक, प्रापंचिक तणाव कमी करणारा आहे. रवि-नेपच्यून नवपंचम योग सत्कारणी उपासना, आराधना यातून आनंद देतो.
दिनांक : २२, २३, २६, २७ शुभ काळ.
महिलांना : सरळ मार्ग, गोड बोलणे, सत्य स्वीकारणे यातून नवरात्र आनंदाची ठरेल.
धनू : सहकार्यातून प्रश्न सुटतील
व्ययस्थानी राहू, मंगळ त्यात मंगळवारी बुधाचा समावेश होईल. गुरूचे परिणाम अनुकूल नाहीत. धनू व्यक्तींना प्रत्येक शब्दाचा उपयोग हुशारीने करावा लागेल आणि यश मिळेपर्यंत योजनांची तयारी गुप्त ठेवावी लागेल. लाभात शनी, दशमात शुक्र, अनुकूल चंद्रभ्रमण प्रतिष्ठेला धक्का बसू देणार नाहीत. ऐनवेळी कोणाचे तरी सहकार्य मिळेल. त्याचा उपयोग व्यापार, राजकारण, कला प्रांत, उधार, उसनवारी यातील प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकेल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : दुसऱ्यावर विश्वासून कृती नको, शारदोत्सव प्रसन्न राहील.
मकर : सफलता आनंद देईल
पंचमात गुरू, दशमात शनी, लाभातील राहू यांचे परिणाम बुध-शुक्र राश्यांतरातून व्यापक होतील आणि विजयादशमी बुध-शुक्र शुभयोग अपेक्षा सफलतेचा आनंद मिळवून देतील. तरीही उपद्रवी शत्रू, शासकीय नियम, आरोग्याची पथ्ये, दिलेली आश्वासने या संबंधात सतर्क राहा. त्यामुळे घोटाळे टळतील. वेगाने पुढे सरकता येईल. कला, साहित्य, शिक्षण, विज्ञानात मकर व्यक्तींचा प्रभाव वाढत राहील.
दिनांक : २२ ते २६ शुभ काळ.
महिलांना : प्रपंच खूश राहील. सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल, नवीन उपक्रम हाती घेता येतील.
कुंभ : शारदोत्सव आनंदाचा
भाग्यात शनी, दशमात राहू, मंगळवारचे बुध राश्यांतर यातून शारदोत्सवातील उपक्रम आनंदात पूर्ण करता येतील. विजयादशमी शुभ चंद्रभ्रमणामुळे प्रसन्न राहील. व्यापार, प्राप्ती, प्रपंच, बौद्धिक प्रांत यामध्ये शनिवापर्यंत कुंभ व्यक्तींचे अधिराज्य कायम करणार आहे. नवीन उपक्रमांचा आरंभ आणि दीपावलीपर्यंतच्या योजनांचा समावेश त्यात करू शकाल. नवे करार होतील. हवेशीर जागा मिळेल, मंगलकार्य ठरणे शक्य आहे.
दिनांक : २४ ते २७ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न हुशारीने वेळापत्रकातील उपक्रम पूर्ण करता येतील.
मीन : हसत खेळत प्रवास
गुरूची अनुकूलता, राहूचे सहकार्य, बुध-शुक्राचे राश्यांतर आणि बुध शुक्राचा शुभयोग शारदोत्सवात कार्यपथावरून हसत खेळत आपणास प्रवास करता येईल. त्यातून नवे संपर्क, संबंध प्रस्थापित करू शकाल. अर्थप्राप्तीचे मार्ग निर्वेध करू शकाल. व्यापारी अंदाज अचूक ठरतील.  अष्टमात रवी-शनी सहयोग असेपर्यंत शत्रू आणि शरीरस्वास्थ्य मधून मधून त्रास देतील. परंतु त्याचा परिणाम प्रगतीवर होणे अवघड आहे. काही समस्या सामोपचाराने सुटतील.
दिनांक : २२, २३, २६, २७ शुभ काळ.
महिलांना : महत्त्वाचे प्रश्न सुटतील आणि सांस्कृतिक, सामाजिक प्रसन्नता मिळवाल.